Wednesday, March 28, 2007
माणसं... हाताच्या अंतरावर असलेलीही....
हाताच्या अंतरावर असलेलीही,दुरच असतात .. माणसंआपली आपली वाटणारीही,परकीच असतात .. माणसं... वरुन सौम्य वाटणारीही, क्रुर असतात .. माणसं गोर्या रंगाचीही, आतुन काळी असतात .. माणसं जोडतात नाती उथळ अन, मनातुन द्वेष पाळतात .. माणसं जाऊ दे !! नको घेऊस वाटुन फारसं, इथुन तिथुन शांत हिरवळ आणि त्यावरचं दव सुर्यकिरणानीं चमकतं...तुझ्या मनचं गुपित कसं हळुच गालावर उमलतं...ओठ् नाही हलले तरी डोळ्यांनिच सारं कळतं...पावसच्या धारा मनात बरसतातनि ओल्या मातीच्या गंधाने रोमांच उभारतात...घनघोर पावसात असच् मन चिंब भिजतं...कोणाच्या आठवणींत रोपटं हळुच रुजतं...स्पर्शही मग हलकासा जाणवतो. जवळ कोणी नसलं तरी सुवास भारुन टाकतो...कधीतरी मग हळुच ओठ थरथरतात कोणाच्या ओठांशी जाउन बिलगतात...डोळे उघडले कि समोर कोणीच नसतं...मन तुझं मग आपल्याशीच हसुन लाजतं सगळीकडे सारखीच असतात ..माणसं !!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment